About AMRUT 2
अटल मिशन फॉर रिज्युव्हिनेशन अँड अर्बन ट्रांसफॉरमेशन २.० (अमृत २.०)
प्रस्तावना
केंद्र शासनाने राज्याच्या नागरी भागामध्ये मुलभूत पायाभूत सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी केंद्र पुरस्कृत अमृत २.० योजना (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation 2.0) राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधी मध्ये राबविण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतलेला अहे. सर्व शहरातील घरांना नळ जोडणी देउन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत 100% स्वयंपूर्ण करणे, जलस्त्रोत पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरीत क्षेत्र विकसीत करणे आणि ४४ अमृत १.० शहरांमध्ये १००% मल प्रक्रिया व मलनिस्सारण जोडणी देणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
अभियानाची व्याप्ती
अमृत २.० अभियानांतर्गत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था पाणी पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करुन प्रत्येक घरात नळ जोडणी देण्यात येइल आणि यापूर्वीच्या अमृत अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या ४४ शहरांमध्ये १००% मल नि:स्सारण व्यवस्था देखील उभारण्यात येइल. या अभियानांतर्गत खालील घटकांसाठीचे प्रकल्प समाविष्ट करण्यात येतील.
- पाणी पुरवठा
- सांडपाण्याचा पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया प्रकल्प
- जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन प्रकल्प
- हरीत क्षेत्र प्रकल्प
या अभियानाद्वारे राज्यातील शहरे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण (Water Secure) बनविण्यात येतील तसेच, जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन केले जाइल, त्याचप्रमाणे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जाइल व पावसाच्या पाण्याच्या साठवणकूीचे (Rain Water Harvesting) उद्दिष्ट जल सहभागातून पूर्ण केले जाइल.
वित्तीय अकृतीबंध
अमृत २.० अभियानांतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत सादर होणाऱ्या प्रकल्पांसाठी एकूण प्रकल्प किमतीपैकी केंद्र शासन, राज्य शासन व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आर्थिक हिस्स्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे राहील:-
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रकार | केंद्र हिस्सा (%) | राज्य हिस्सा (%) | नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा (%) |
---|---|---|---|
अ+, अ वर्ग व ब वर्ग महानगर पालिका (६) | २५ | २५ | ५० |
क वर्ग महानगर पालिका (४) | २५ | ४५ | ३० |
ड वर्ग महानगर पालिका (१८) | ३३.३३ | ३६.६७ | ३० |
अ वर्ग नगर परिषद (१६) | ३३.३३ | ५१.६७ | १५ |
ब वर्ग नगर परिषद (७३) | ५० | ४० | १० |
क वर्ग नगर परिषद व नगरपंचायती (२९६+) | ५० | ४५ | ५ |
अमृत २.० अभियानांतर्गत प्राप्त होणारा केंद्र हिस्स्याचा निधी घटक निहाय सर्वसाधारणपणे खालील प्रमाणात विनियोगात वापरणे अभिप्रेत अहे.
अ.क्र. | प्रकल्प घटक | केंद्रीय अर्थसहाय्य |
---|---|---|
१. | पाणी पुरवठा प्रकल्प | ५२.८१% |
२. | जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन व हरीतक्षेत्रे तसेच उद्याने विकसित करणे | ५.८४% |
३. | मलभन:स्सारण व्यवस्थापन प्रकल्प उभारणे | ४१.३५% |
एकूण | १००% |