नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरवण्यासाठी साहाय्य योजना अनुदान
योजनेचे स्वरूप :-
नव्याने स्थापन होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायतींचा सुनियोजित विकास करता यावा यासाठी “नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य” योजनाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा मलनिस्सा:रण व नागरी स्वच्छता, सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास, नागरी दळणवळण साधनांचा विकास, शालेय शिक्षणाशी निगडीत, पायाभूत सुविधांचा विकास, नागरी आरोग्याशी निगडीत पायाभूत सुविधांचा विकास, विकास आराखडा तयार करणे इ. कामे या योजनेमधून करण्यात येतात.