नगपरिषद वैशिष्ठ्यपूर्ण- ठोक तरतूद योजना अनुदान (विशेष वैशिष्ठ्यपूर्ण)
योजनेचे स्वरूप :-
"वैशिष्ट्यपुर्ण" या योजनेअंतर्गत विभागाच्या मंजूर नियतव्ययामधून वितरीत करण्यात येणाऱ्या निधीमधून नाविण्यपूर्ण अभिनव अशा स्वरुपाची कामांस प्राधान्य देण्यात येते. सदरहू काम नगरपरिषदेच्या आवश्यक व स्वेच्छाधीन कर्तव्याशी सुसंगत असणे आवश्यक आहे. सदर योजेअंतर्गत हाती घेतलेले काम सर्वसाधारणपणे भांडवली स्वरुपाचे असावे ज्यायोगे भविष्यात नगरपालिकांना आर्थिक स्वयंपुर्ण होण्यासाठी कायम स्वरुपी उत्पन्नाचा स्त्रोत मिळून देण्याच्या दृष्टीने फायदेशीर राहील. या योजेअंतर्गत प्रशासकीय इमारतींसंबंधीची कामे, बहुपयोगी सभागृहे, नाट्यगृहे , व्यापारी संकुले, आठवडी बाजार, सर्व धर्म/ समाज यांच्या स्मशानभुमी, हरीतपट्टे विकसीत करणे, क्रीडांगणे, पाणीपुरवठ्यासंबंधीची कामे तसेच प्रलंबित प्रकल्प पुर्ण करण्यासाठी निधी इ. कामे सदर योजनेच्या अनुषंगाने करण्यात येतात.