महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अनुदान
योजनेचे स्वरूप :-
“महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास” या योजनेअंतर्गत हाती घ्यावयाची कामे सर्वसाधारणपणे नागरिकांच्या ठळकपणे लक्षात येतील किंवा नागरिकांना त्या कामांचा स्पष्ट बोध होईल अशा स्वरुपाची आहेत. जसे की, शहरी भागातील पाणीपुरवठ्याची व मलनिस्सारणाची कामे, प्रमुख नागरी मार्ग, प्रमुख रस्त्यावरील पथदिवे/ हायमास्ट, सामाजिक सभागृह/ संकुले/ व्यायामशाळा, नवीन प्रशासकीय इमारत/ नुतणीकरण, बगीचे, स्मशानभुमी, हरीत पट्टे विकसीत करणे, महानगरपालिकेच्या मुलभूत कर्तव्याशी निगडीत नागरी सेवा व पायाभूत सुविधा यांच्याशी संबंधित कामे इ. कामे सदर योजनेच्या अनुषंगाने करण्यात येतात.