पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)
पुणे, पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी आणि आजूबाजूच्या ७ हजार ३५७ sq.km विकासाचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पीएमआरडीएची स्थापना केली. ३१ मार्च २०१५ रोजी महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने पीएमआरडीएची स्वतंत्र स्वायत्त संस्था म्हणून स्थापना केली. ३१ मार्च २०१५ रोजी महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने पीएमआरडीएची स्वतंत्र स्वायत्त संस्था म्हणून स्थापना केली. दीर्घकालीन नियोजन, विकास आराखड्याची अंमलबजावणी, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मेट्रो रेल्वे, आवश्यक पायाभूत सुविधा आणि या भागातील आर्थिक विकासाला चालना देणे ही पीएमआरडीएची प्रमुख उद्दिष्टे आहेत. पीएमआरडीए ही महानगर प्रदेशाच्या नियोजनबद्ध विकासासाठी जबाबदार घटनात्मक अधिकार असलेली संस्था आहे.
पीएमआरडीए सक्षम नेतृत्वाने आणि मा.मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते जे या संस्थेचे अध्यक्षदेखील आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या भागाला आंतरराष्ट्रीय महत्वाचे आकर्षक गुंतवणूक केंद्र बनविण्याच्या उद्देशाने काम करीत आहे.