विशेष रस्ता अनुदान योजना
योजनेचे स्वरूप :-
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना “सर्वसाधारण रस्ता अनुदान” व “विशेष रस्ता अनुदान” अशा दोन प्रकारे रस्ता अनुदान वितरीत करण्यात येतो. “सर्वसाधारण रस्ता अनुदान” मधून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील नियमित स्वरुपाची कामे तसेच, “विशेष रस्ता अनुदान” मधून मोठी ठळक स्वरुपाची कामे घेण्यात यावीत. “सर्वसाधारण रस्ता अनुदान” मंजूर करून शिल्लक अर्थसंकल्पीय तरतूद व मागणीचे प्रस्ताव विचारात घेऊन आवश्यकतेनुसार महानगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायत यांना “विशेष रस्ता अनुदान” मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येते. सदरचे अनुदान मंजूर करतेवेळी वित्तीय परिस्थिती, स्थानिक गरज व प्राथमिकता, पूरक विकास, भौगोलिक परिस्थिती, नागरीकरणाचा दर, पूरक दळणवळण साधनांचा विकास, हागणदारीमुक्त व स्वच्छ शहराची निर्मीती इ. बाबींचा विचार करण्यात येतो.