पैठण आपेगाव शहर विकास प्राधिकरण
योजनचे नाव :-
पैठण व आपेगाव विकास प्राधिकरणाच्या आराखड्यास मान्यता देणेबाबत (लेखाशिर्ष 2217 9616)
योजनेचे स्वरूप :-
पैठण व आपेगाव शहराच्या विकास आराखड्याची कामे ही यात्रास्थळांच्या विकास कार्यक्रमासाठी सहाय्य अनुदान या योजनेअंतर्गत भागविण्यात येतो. सदर योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, भुयारी गटार योजना, वाहनतळ विकसीत करणे, सुरक्षा व्यवस्था, पुनर्वसन, मंदिर परिसर पर्यटन विकास, नदी काठावरील विकास कामे, भक्त निवास, पुरातन स्थळांचे संवर्धन इ. कामे करण्यात येतात.