पहिल्या राज्य वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील गिरीस्थान नगरपरिषद यांना विशेष पर्यटन विकास अनुदान
योजनचे नाव :- गिरीस्थान नगरपरिषदांना पर्यटन विकास अनुदान योजना
(लेखाशिर्ष 2217 1212)
योजनेचे स्वरूप :-
पहिल्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील प्रत्येक गिरीस्थान नगरपरिषदेस दरवर्षी रुपये 10 लाख पर्यटन विकास अनुदान द्यावयाचे आहे. या शिफारशी सन 1999-2000 पासून लागू करण्यात आल्या असून नगरपरिषद क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविध पुरविण्यासाठी सदर विशेष अनुदान देण्यात येते. त्यानुसार राज्यातील 6 गिरीस्थान नगरपरिषदांना पर्यटन विकासाच्या अनुषंगाने भरीव अनुदान देण्यात येते.
या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता, रस्त्यांची निगा राखणे, आरोग्य संबंधीची उपाययोजना, पर्यटन स्थळांची व्यवस्था, बगीचे आकर्षक करणे, पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करणे इ. कामे करण्यात येतात.