महानगरपालिका त्यांच्या नव्याने विस्तारलेल्या सीमाक्षेत्रांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी साहाय्य अनुदान योजना
योजनचे नाव :- महानगरपालिका/ नगरपरिषदा यांची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य करण्याबाबत.
(लेखाशिर्ष 2217 9483/ 2217 9518)
योजनेचे स्वरूप :-
महानगरपालिका/ नगरपरिषदा यांच्या नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांच्या विकासाला चालना मिळावी व अशा भागांचा सुनियोजित विकास व्हावा या दृष्टीने सदर योजनेअंतर्गत हद्दवाढीच्या भागातील घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व मलनिस्सा:रण व नागरी स्वच्छतासंबंधीची कामे, सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास, नागरी दळणवळण साधनांचा विकास, शालेय शिक्षणाशी निगडीत पायाभूत सुविधांचा विकास, नागरी आरोग्याशी निगडीत पायाभूत सुविधांचा विकास तसेच इतर संकीर्ण कामे जसे, आधार केंद्र निर्माण करणे, वाणिज्य संकुल निर्माण करणे, फेरीवाला क्षेत्र विकसीत करणे इ. कामे सदर योजनेअंतर्गत करण्यात येतात.