यात्रास्थळ योजना अनुदान
योजनचे नाव :- तीर्थक्षेत्र विकास योजना
(लेखाशिर्ष 2217 8093/ 2217 0951)
योजनेचे स्वरूप :-
राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या/ यात्रास्थळांच्या ठिकाणी भेट देणाऱ्या यात्रेकरुंची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. त्याअनुषंगाने तीर्थक्षेत्र विकास योजनांचे आराखडे मंजूर करणे तसेच तत्संबंधी निधी उपलब्ध करण्यात येतो. या योजनेअंतर्गत अतिमहत्वाचे प्रसिध्द असे देवस्थान त्याचप्रमाणे सदर देवस्थानांचा संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत “अ”,” ब” व “क” अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येतो. सदर योजनेमधुन तीर्थक्षेत्रांसंबंधीत कामे जसे की, पिण्याची पाण्याची योजना राबविणे, सुलभ शौचालयाच्या धर्तीवर स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, गावातील एस. टी. स्थानक किंवा रेल्वे स्थानकापासून तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विकास करणे इ. संबंधी कामे करण्यात येतात.